कवी गीतकार ना. धो. महानोर व जेष्ठ विचारवंत हरी नरके यांना श्रध्दांजली श्री शिवाजी महाविद्यालयातील मराठी आणि संगीत विभागाच्या वतीने आयोजित ‘आठवण रानकवीची‘ या गीतगायन कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवंगत निसर्ग कवी तथा गीतकार ना. धो. महानोर व जेष्ठ विचारवंत हरी नरके यांना शनिवार दि.१९ ऑगस्ट २०२३ रोजी गीतमय श्रध्दांजली वाहिली. सदरील कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, मराठी विभागप्रमुख डॉ. प्रल्हाद भोपे, संगीत विभागप्रमुख प्रा. सविता कोकाटे आदी उपस्थित होते.
ना.धो. महानोर शेती, शिवार तसेच निसर्गाचे कवी होते. कविता जगणारा कवी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. शेती-शेतकायांचे प्रश्न सरकार दरबारी मांडणारा कवी हरपल्याचे मत प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी व्यक्त केले. तर उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे यांनी त्यांचे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात केले तरच खरी श्रद्धांजली ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले. सदरील कार्यक्रमात ना.धो. महानोरांची चित्रपट गीते विद्यार्थ्यांनी गाऊन त्यांना गीतमय आदरांजली वाहिली. अभिरुपा पैंजनेने गायलेले ‘मन चिंब पावसाळी‘, गायत्री साखरे हिने ‘घन ओथंबून येती‘, अभिषेक होळंबे याने ‘लिंगोबाचा डोंगुर‘, गाऊराव भालेराव याने ‘खालच्या अडीत गातो‘, नेहा डहाळे हिने ‘चैताचा रंग, वैष्णवी गिरी आणि प्रतीक यांनी ‘चिंब पावसाने रान झालं‘ आदी गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. सोबतच रोहिणी सूर्यवंशी, गीत साळापुरीकर, आरती महामुने, गायत्री सांगेकर यांनीही गीते सादर केली. त्याप्रसंगी अनुष्का हिवाळे व विशाखा माने हिने तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
वक्तृत्व व निबंधलेखन स्पर्धा विभागाच्या वतीने व आकाशवाणी केंद्र, परभणीच्या सहकार्याने G20 शिखर संमेलन अंतर्गत दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण ४६ विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी G20 शिखर संमेलनाकडून अपेक्षा, विश्वगुरु भारत, वसुधैव कुटुंबकम हे विषय ठेवण्यात आले होते. निबंध स्पर्धेत दिपक फुलझळके, निकिता आसेवर, पार्श्वनाथ संघई अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृत्तीय क्रमांकाने विजयी झाले. वक्तृत्व स्पर्धेत अनुसया कुलथे, घाटोळ पुंडलिक अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांकाने विजयी झाले. विजेत्या स्पर्धकांस परभणी आकाशवाणी केंद्राच्या मा. सुमेधा कुलकर्णी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, मराठी विभागप्रमुख डॉ. प्रल्हाद भोपे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, टी शर्ट, पेन देऊन गौरविण्यात आले.
हैद्राबाद मुक्तीसंग्राम समजून घेतांना व्याख्यान
मराठी विभाग व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव, नाशिक यांचे हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्ताने जाहीर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बाळासाहेव जाधव, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. अशोक सोनी, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सदस्या डॉ. संगीता आवचार आदी उपस्थित होते.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाने दिनांक १ जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम आयोजित केले होते. त्यामध्ये निबंध लेखन स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, भित्तिपत्रक लेखन स्पर्धा, मराठी गीत गायन स्पर्धा, निमंत्रित कवींचे कवीसंमेलन, व्याख्यान, मराठी सामान्य ज्ञान परीक्षा उपक्रमांचे आयोजन केले होते. काव्यवाचन स्पर्धेमध्ये १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता; तर मराठी सामान्य ज्ञान वस्तुनिष्ठ परीक्षेत 26 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्याचबरोबर कवी शंकर कदम, कवयित्री अनुराधा बायकोस, दुर्गा देशमुख, प्रा. पल्लवी देशपांडे यांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या काव्य वाचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. निबंध स्पर्धेमध्ये एकुण १२ विद्यार्थ्यांनी सहभाग मिळवला. निबंध स्पर्धेसाठी माझा आवडता साहित्यिक, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी माझी भूमिका‘, ‘भारतीय लोकशाही आणि निवडणुका‘ हे विषय ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर मराठी भाषा, समाज, साहित्य व संस्कृती या विषयावर भित्तिपत्रक स्पर्धा घेण्यात आली. यामध्येही १२ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्याचबरोबर डॉ. सच्चिदानंद बड़के यांचे ‘मराठी भाषा- दशा आणि दिशा‘ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव होते, तर मंचावर उपप्राचार्य प्रा.डॉ. रोहिदास नितोंड मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रल्हाद भोपे, संगीत विभागप्रमुख प्रा. सविता कोकाटे, प्रा.डॉ. आर. एस. बडूरे, प्रा. माया रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. बक्षीस वितरणापूर्वी मराठी व संगीत विभागाच्या संयुक्त विद्यमाने मराठी मातीचे गायन सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे अभिनंदन मान्यवरांनी केले.
या स्पर्धेतील बक्षीस वितरण सोहळा मराठी भाषा दिनाच्या औचित्याने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव होते तर मंचावर उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रल्हाद भोपे, संगीत विभाग प्रमुख प्रा. सविता कोकाटे, प्रा. डॉ.आर. एस. बडूरे प्रा. माया रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. बक्षीस वितरणापूर्वी मराठी व संगीत विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी मातीचे गायन’ सुमधुर मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे अभिनंदन मान्यवरांनी केले.
१. भित्तिपत्रक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक राधिका विलास जोगळेकर, द्वितीय क्रमांक श्रीकांत काळे, तृतीय क्रमांक – गोविंद चितळकर यांनी प्राप्त केला.
२ . गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गायत्री साखरे, द्वितीय क्रमांक गाऊराज भालेराव, तृतीय क्रमांक – स्नेहा डहाळे हिने प्राप्त केला.
३. मराठी सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक नेहा देशपांडे, द्वितीय क्रमांक नागनाथ जावळे, तृतीय क्रमांक- हर्षदा पिंपळे यांनी पटकाविला.
४. काव्यवाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक साक्षी कदम, द्वितीय क्रमांक डहाळे स्नेहा, तृतीय क्रमांक – दिपक फुलझळके यांनी प्राप्त केला.
५. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक निकिता आसेवार, द्वितीय-शारदा बेंडे, तृतीय राधिका जोगळेकर यांनी मिळविला.
अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी मराठी विभागाचे अभिनंदन करून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषा खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा होण्यासाठी साहित्यिक बुद्धिवंतांनी कार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले, नवीन पिढीने मराठी भाषिक कौशल्य उत्तम प्रकारे आत्मसात करणे काळाची गरज आहे असे ते म्हणाले, मराठी विभाग राबवित असलेल्या उपक्रमातून लेखक तयार व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मरादी विभागप्रमुख डॉ. प्रल्हाद भोपे यानी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका पासंगे यांनी केले व आभार डॉ. आर. एम. बडूरे यांनी मानले. गीतगायन स्पर्धेचे परीक्षण ऋतुजा वनकर व प्रा सविता कोकाटे यांनी केले. भाषा संवर्धन पंधराव मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागातील प्रा. तेजस्विनी कपाटे प्रा. अनिल बडगुजर, अतुल समिंद्रे, प्रा. अंकुश खटिंग, प्रा. अमोल गवई, वा. रवि सोनवणे, डॉ. विजय परसोडे, श्री साहेबराव यल्लावाड, सादिक, श्रीकांत काळे, साक्षी कदम, शारदा बेंडे, अनुष्का हिवाळे, किशन जाधव, स्नेहा डहाळे, राधिका जोगळेकर यांनी प्रयत्न केले.
कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती
मराठी विभागाच्या वतीने २३ फेब्रुवारी २०२४ रोजी कर्मयोगी गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली, त्याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, डॉ. रोहिदास नितोंडे मराठी विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
बहुविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व म.शि.प्र. मंडळ, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने दिनांक १६ मार्च २०२४ रोजी संत साहित्याची प्रासंगिकता‘ या विषयावर एक दिवशीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्राचे उद्घाटन संत साहित्याच्या अभ्यासक ह. भ. प. तुकारामजी गरुड यांच्या प्रमुख हस्ते झाले. उदघाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव होते. तर बीजभाषक म्हणून माजी उपप्राचार्य डॉ. विद्यासागर पाटांगणकर यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. मा.मा. जाधव व महानुभाव आश्रम परभणीचे संचालक, प.पु.महंत देमेराजबाबा कपाटे यांची उपस्थिती होती. तर मंचावर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य तथा म.शि.प्र मंडळ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा. हेमंतराव जामकर, स्वा.रा. तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य इंजि. नारायण चौधरी, सौ. शारदाताई दैठणकर, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, महाविद्यालय गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. उत्कर्ष किट्टेकर, मराठी विभाग प्रमुख व चर्चासत्र समन्वयक डॉ. प्रल्हाद भोपे यांची होती.
उद्घाटनीय भाषणामध्ये संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. तुकाराम महाराज गरुड म्हणाले की, “आज सगळे जग विज्ञानाच्या प्रभावाखाली वावरत आहे. हे टाळता येणेही अशक्य आहे. विज्ञानाची विविध भयावह दृश्य युद्धाच्या रूपाने दिसू लागली आहेत.. अशावेळी अध्यात्म आणि संत साहित्याच्या माध्यमातून विज्ञानाची भयावहकता थांबवता येणे शक्य आहे”. पुढे बोलताना डॉ. गरुड म्हणाले, “संत साहित्य अध्यात्मिक विकास करणारे तर आहेच सोबतच ते भक्तीप्रदानही आहे. राजकारण, धर्म, पंथ यांच्या माध्यमातून विज्ञानाची संहारकता थांबवता येणे शक्य नाही. त्यासाठी समाजात अध्यात्म रुजविणे गरजेचे आहे. अध्यात्माच्या माध्यमातून संत साहित्य रुजवून आजच्या विज्ञानाचे विपरीत परिणाम थांबवले जाऊ शकतात, ज्ञानेश्वरी वैश्विक ग्रंथ आहे. आज ज्या पद्धतीने लहान मुलांच्या हाती मोबाईल दिला जातो याउलट ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला तर समाजात चांगल्या संस्काराला सुरुवात होईल, जीवन सुंदर कसे करावे याचे पूर्ण रूपाने मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी होय. अशा संत ग्रंथाच्या माध्यमातून आपण विज्ञानाच्या भयावहता कमी करू शकतो” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव म्हणाने, संत साहित्याने समाजात समतेची बीजे रूजवली, काळानुरूप मराठी भाषा आणि साहित्यात बदल करून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवून आणले जाऊ शकतात. साहित्यातून नैतिक मूल्यांची शिकवणी दिली तर समाज बदलासाठी महत्वाचे ठरेल असेही ते म्हणाले,
आपल्या बीजभाषणात डॉ. विद्यासागर पाटांगणकर म्हणाले, “संत साहित्य सर्वव्यापी आहे. वा साहित्याने समग्र माणूस पाहिला. त्यामुळे त्यात माणसास आत्मानंद आणि संमग्रत्व मिळते. संत साहित्याने समाजाला दिशा दिली आहे. स्वातंत्र्य, स, बंधुता, न्याय हा विचारांचा संस्कार संत माहित्याने समाजावर केला. समकालीन सामाजिक उतरंडीला संत साहित्याने सुरुंग लावला”. हे कार्य अत्यंत प्रासंगिक आहे असे मत व्यक्त केले, यावेळी मान्यवरांच्या हस्ते १२० शोधनिबंधाचा संकलन असलेल्या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. त्याचवरोबर ई-जर्नलचेही संगणक बेवसाईट कळ दाबून प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील प्राध्यापक, संशोधक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रल्हाद भोपे, सूत्रसंचलन प्रा.अनिल बडगुजर तर आभार प्रदर्शन डॉ. राजू बडूरे यांनी मानले.
सत्र पहिले
दुसत्या सचाच्या अध्यक्षस्थानी मराठी अभ्यान मंडळाचे डॉ. मा.मा. जाधव होते तर मंचावर डॉ. पंढरीनाथ धोंडगे, डॉ. सारिका बुरंगे यांनी शोधनिबंध वाचन केले. त्याचबरोबर मराठी अध्ययन व संशोधन विभाग राणी चेन्नमा विद्यापीठ, बेळगाव (कर्नाटक) येथून ऑनलाइन मोडवर प्रोफेसर डॉ. मनीषा नेसकर यांनी ‘संत माहित्याची प्रासंगिकता’ या विषयावर सविस्तर विवेचन केले.
अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. जाधव यांनी संत माहित्यातील मूल्यविचार व आधुनिक जगाबाबत विवेचन केले. त्याचबरोबर दुर्लक्षित संत माहित्याचाही विचार केला. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. राजू बडूरे यांनी केले तर आभार डॉ. प्रल्हाद भोपे यांनी मानले. भोजनानंतर दुपारी दोन वाजता दुसत्या सत्राला सुरुवात झाली.
दुसरे सत्र
या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रोफेसर डॉ. आनंद इंजेगावकर हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून मराठी विभाग प्रमुख, काशी हिंदू विद्यापीठ, बनारस (उत्तर प्रदेश) डॉ. प्रमोद पडवळ यांची ऑनलाईन उपस्थिती होती. तर मंचावर शोध निबंध वाचक डॉ. न. व. कदम, लासूर स्टेशन, डॉ. विठ्ठल जंबाले, देगलूर यांची उपस्थिती होती.
तिसरे सत्र
या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. वैशाली गोस्वामी कुलकर्णी होत्या तर प्रमुख वक्ते डॉ. रवींद्र बेंबरे होते. तर शोधनिबंधवाचन डॉ. नागेश अंकुश, डॉ. मुंजाभाऊ कव्हळे, मयुरी शिंदे यांनी केले. सर्वच सत्रातून संबंधित विषयावर साधकबाधक चर्चा घडून आली.
समारोपीय कार्यक्रम
चर्चासत्राच्या समारोप समारंभ उपप्राचार्य डॉ श्रीनिवास केशट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी इंजिनियर नारायण चौधरी (निमंत्रित सदस्य महाविद्यालय विकास समिती तथा सिनेट विद्या परिषद स्वा.रा.तीर्थ विद्यापीठ नांदेड) यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे, महाविद्यालय गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. उत्कर्ष किट्टेकर, मराठी विभाग प्रमुख तथा समन्वयक डॉ. प्रल्हाद भोपे, सहसमन्वयक डॉ. राजू बडूरे उपस्थित होते. याप्रसंगी सहभागी शोधनिचंधवाचक डॉ. कल्याण गोपनर व कविता लव्हाळे मनोगताद्वारे चर्चासत्राचा अभिप्राय दिला, तर समन्वयक डॉ. प्रल्हाद भोपे यांनी चर्चासत्राचा अहवालाचे वाचन केले. सर्व सहभागीना प्रमाणपत्रांचे वाटप करून अध्यक्षीय समारोपात डॉ. केशट्टी यांनी मानवी जीवनात अध्यात्माची गरज, वैज्ञानिक दृष्टिकोन, बदलते तंत्रज्ञान आणि बदलती मनुष्याची जीवनशैली यासाठी संत साहित्य किती महत्त्वाचे आहे हे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे आभार समन्वयक डॉ. प्रल्हाद भोपे यांनी मानले व प्रा.अंकुश खटिंग यांनी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली. चर्चासत्राच्या यशस्वितेसाठी चर्चासत्र समिती समन्वयक व सदस्य डॉ. शेषराव राठोड, डॉ. प्रशांत सराफ, डॉ. जयंत बोबडे, डॉ. सुरेंद्र येनोरकर, डॉ.एम.ए. शेख, डॉ.टी. आर. फिसफिसे, प्रा. अतुल समद्रि, प्रा. अंकुश खटिंग, सुरेश पेदापाल्नी, सब्बद नादिक, साहेबराव येलेवाड आदींनी पुढाकार घेतला.